. “कोणालाही आणा, रस्ता देणार नाही!” वाकीत रस्ता अडवून शेतकऱ्याला धमक्या; जामखेड तहसीलदारांकडे धाव ; कारवाईची मागणी जामखेड (प्रतिनिधी): १३ऑक्टोबर २०२६जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वाकी येथील एका शेतकऱ्याचा शेतात आणि घराकडे जाणारा जुना पारंपरिक रस्ता बेकायदेशीरपणे अडवून त्यांना धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकरी नवनाथ केशव धायगुडे यांनी जामखेडचे . तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून रस्ता मोकळा करण्याची आणि अडवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नेमकी काय आहे घटना?मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार नवनाथ केशव धायगुडे (रा. वाकी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांची वाकी येथील गट क्रमांक ८४ मध्ये शेतजमीन व घर आहे. सदर शेतात आणि घराकडे ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून (कायम जुना) रस्ता अस्तित्वात आहे. हा रस्ता ज्या जमिनीतून जातो, तेथील स्थानिक नागरिक १) ज्योतीराम दत्तात्रय खताळ, २) अर्जुन बाळू खताळ, आणि ३) योगेश आनंद जगताप यांनी सदर रस्ता बेकायदेशीरपणे अडवला असल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. अर्जात नमूद केल्यानुसार, रस्ता बंद केल्यामुळे शेतात जाणे-येणे पूर्णपणे थांबले आहे. याशिवाय संबंधित व्यक्तींकडून अर्जदारास मानसिक त्रास दिला जात असून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. “तुम्ही कोणालाही घेऊन या, आम्ही हा रस्ता देणार नाही” अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरून त्यांना रोखले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रस्ता अडविल्यामुळे शेतातील दैनंदिन कामे खोळंबली असून पिकांची मशागत व देखभाल करणे कठीण झाले आहे. या अडूनमुठपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून अर्जदाराला आर्थिक व मानसिक फटका सहन करावा लागत आहे. या प्रकरणी महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि अडवलेला रस्ता तात्काळ मोकळा करून देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी अर्जदाराने केली आहे.
सामाजिक
जामखेड:४ ऑक्टोबर २०२६ तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी येथील सोलर प्लॅनेटवर प्रकल्प सुरू झाल्यापासून सलग ३ वर्षे अविरत...
Aahilyangr 26 सप्टेंबर 2026 महाराष्ट्र शासनाने कृषी आयुक्तांच्या अहवालाआधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (पहिली कळ) नुसार दुष्काळी...
बीड प्रतिनिधी :25वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष संघटना बांधणीला वेग देण्यासाठी राज्य कार्यकारी सदस्यांवर जिल्हानिहाय व लोकसभा क्षेत्रनिहाय...
खर्डा:१७ सप्टेंबर २०२६ जिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक...
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक ऐक्य जपण्याचे एक उत्तम उदाहरण जामखेडमध्ये पाहायला मिळत...
जामखेड (प्रतिनिधी)१३ सप्टेंबर २०२६ समता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष गव्हाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोळे...
जामखेड (प्रतिनिधी : १३, सप्टेंबर २०२६ पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर घाम गाळला आणि ज्या मातीने कुटुंबाचा सांभाळ केला,...
खर्डा(विशेष प्रतिनिधी): १३ सप्टेंबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर मराठा आंदोलक श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या...
जामखेड :11 सप्टेंबर 2026सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेव अधक्ष संतोष गव्हाळे...
