# Police Warrant

- Site: https://policewarrantnews.in/

## जामखेडमध्ये थरारक रक्तपात: चहाच्या दुकानात बसलेल्या युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, मनगटापासून हात केला वेगळा!

- Link: https://policewarrantnews.in/sensational-bloodshed-in-jamkhed-deadly-machete-attack-on-a-youth-sitting-at-a-tea-stall-hand-severed-from-the-wrist/
- Published: 2026-10-14T17:09:34+00:00
- Author: Police Warrant

​जामखेड प्रतिनिधी:१४ ऑक्टोबर २०२६

​ जामखेड नगर रस्त्यावरील एका चहाच्या दुकानात बसलेल्या राहुल अंधारे (वय ३४) या युवकावर
तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर
आली आहे. या हल्ल्यात राहुल अंधारे यांचा एक हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला असून,
या थरारक घटनेमुळे जामखेड शहरात मोठी दहशत पसरली आहे.

**​नेमकी घटना कशी घडली?**मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अंधारे हे नेहमीप्रमाणे जामखेड-
नगर रस्त्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी व मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी
आले होते. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलमध्ये बसले असताना,
अचानक दोन हल्लेखोर हातात घातक शस्त्रे घेऊन तिथे घुसले, तर तिसरा तरुण बाहेर मोटारसायकलवर
ताटकळत उभा होता.

हॉटेलमध्ये शिरलेल्या दोघांनी थेट राहुल अंधारे यांच्यावर वार केला. हा वार चुकवण्याचा
प्रयत्न करत असताना अंधारे यांनी आपला हात पुढे केला, त्याचवेळी हल्लेखोराने केलेल्या
भीषण वाराने त्यांचा एक हात मनगटाच्या वरच्या बाजूने तुटून बाजूला पडला. या भयानक प्रकारामुळे
परिसरात रक्ताचा सडा पडला आणि एकच पळापळ उडाली. यानंतर तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून
अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेनंतर उपस्थित काही धाडसी नागरिकांनी गंभीर जखमी राहुल अंधारे यांना, तसेच त्यांचा
तुटलेला हात एका कागदी पिशवीत गोळा करून तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात (समर्थ
हॉस्पिटल) दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना
पुढील उपचारासाठी तात्काळ अहिल्यानगर (अहमदनगर) येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या
प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी
तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही
फुटेज ताब्यात घेतले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा
शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये
चिंतेचे वातावरण असून, पोलीस आरोपींना कधी जेरबंद करतात आणि यामागील नेमके कारण काय,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

**कलाकेंद्रातील वादाची किनार?**

राहुल अंधारे यांच्याशी संबंधित एका कलाकेंद्रातील वादानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वीच कलाकेंद्रावरून
काहीसा वाद झाल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे. याच जुन्या किंवा ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर
हा पूर्वनियोजित हल्ला झाला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या हल्ल्याचे
नेमके कारण पोलीस तपासातच स्पष्ट होणार असून पोलीस त्या दिशेने कसून तपास करत आहेत.

## “कोणालाही आणा, रस्ता देणार नाही!” वाकीत रस्ता अडवून शेतकऱ्याला धमक्या; जामखेड तहसीलदारांकडे धाव ; कारवाईची मागणी

- Link: https://policewarrantnews.in/bring-anyone-i-wont-give-a-way-threatening-a-farmer-by-blocking-a-road-in-vaki-run-to-jamkhed-tehsildar-demand-for-action/
- Published: 2026-10-14T08:23:27+00:00
- Author: Police Warrant

.

“कोणालाही आणा, रस्ता देणार नाही!” वाकीत रस्ता अडवून शेतकऱ्याला धमक्या; जामखेड तहसीलदारांकडे
धाव ; कारवाईची मागणी

जामखेड (प्रतिनिधी): १३ऑक्टोबर २०२६
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वाकी येथील 
एका शेतकऱ्याचा शेतात आणि घराकडे जाणारा जुना पारंपरिक रस्ता बेकायदेशीरपणे अडवून त्यांना
धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकरी नवनाथ केशव धायगुडे यांनी
जामखेडचे . तहसीलदार  यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून रस्ता मोकळा करण्याची आणि अडवणूक
करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  

नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार नवनाथ केशव धायगुडे (रा. वाकी,
ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांची  वाकी येथील गट क्रमांक ८४ मध्ये शेतजमीन व घर आहे.
सदर शेतात आणि घराकडे ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून (कायम जुना) रस्ता अस्तित्वात आहे.
हा रस्ता ज्या जमिनीतून जातो, तेथील स्थानिक नागरिक १) ज्योतीराम दत्तात्रय खताळ, २)
अर्जुन बाळू खताळ, आणि ३) योगेश आनंद जगताप यांनी सदर रस्ता बेकायदेशीरपणे अडवला असल्याचा
गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.  

अर्जात नमूद केल्यानुसार, रस्ता बंद केल्यामुळे शेतात जाणे-येणे पूर्णपणे थांबले आहे.
याशिवाय संबंधित व्यक्तींकडून अर्जदारास मानसिक त्रास दिला जात असून वारंवार धमक्या
दिल्या जात आहेत. “तुम्ही कोणालाही घेऊन या, आम्ही हा रस्ता देणार नाही” अशा प्रकारची
अरेरावीची भाषा वापरून त्यांना रोखले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
  रस्ता अडविल्यामुळे
शेतातील दैनंदिन कामे खोळंबली असून पिकांची मशागत व देखभाल करणे कठीण झाले आहे. या 
अडूनमुठपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून अर्जदाराला आर्थिक व मानसिक फटका सहन करावा
लागत आहे.  या प्रकरणी महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी
करावी आणि अडवलेला रस्ता तात्काळ मोकळा करून देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी अर्जदाराने
केली आहे.

## ज्योत पोहोचण्याआधीच घराचे दिवे विझले;तुळजापूरहून ज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू, १ गंभीर

- Link: https://policewarrantnews.in/the-lights-of-the-homes-went-out-before-the-flame-even-arrived-the-cruel-hand-of-fate-strikes-while-bringing-the-holy-flame-from-tuljapur-3-youths-killed-1-critical-in-a-horrific-accident/
- Published: 2026-10-11T16:20:50+00:00
- Author: Police Warrant

**छत्रपती संभाजीनगर:११ नोव्हेंबर २०२६
तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन
घराकडे ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना 
घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव पांढरी परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला
दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला
आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी
शोककळा पसरली आहे.मृत तरूण: अक्षय राजपूत, अमोल ओट आणि गोरख म्हस्कर (सर्व रा. खुलताबाद
तालुका, जि. छत्रपती संभाजीनगर).गंभीर जखमी: शुभम आधाने (वर रुग्णालयात उपचार सुरू 
आहेत).घटनास्थळ: पिंपळगाव पांढरी परिसर, छत्रपती संभाजीनगर.अपघाताचे कारण: तुळजापूरहून
देवीची ज्योत घेऊन एमएच-२० (MH-20) क्रमांकाच्या दुचाकीवरून परतत असताना पाठीमागून 
आलेल्या एका अज्ञात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली.अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून
तात्काळ पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू
केले आणि जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून
फरार कंटेनरचा आणि चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. देवीची 
मंचकी निद्रा संपवून घटस्थापनेसह विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली असून लाखो भाविक
तुळजापुरात दाखल होत आहेत. मात्र, या आनंदाच्या वातावरणात छत्रपती संभाजीनगरमधील या
तरुणांवर आलेल्या काळाच्या झटक्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दुर्दैवी घटनेत
जीवांशी निगडित सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सण-उत्सवाच्या काळात प्रवास
करताना भाविकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

## पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ‘ऑपरेशन ऑल आऊट’; ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर एकाच रात्रीत १,१३६वाहनांची तपासणी, ८२ वॉरंट बजावले!

- Link: https://policewarrantnews.in/operation-all-out-on-the-orders-of-the-superintendent-of-police-a-force-of-over-500-police-personnel-on-the-streets-1136-vehicles-inspected-82-warrants-executed-in-a-single-night/
- Published: 2026-10-11T08:13:30+00:00
- Author: Police Warrant

**अहिल्यानगर**:**११ अक्टूबर २०२६**
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी
आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे दिनांक ९ ऑक्टोबर रोजी
रात्री ११ ते १० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ या वेळेत विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ही धडक मोहीम राबवण्यात
आली.या मोहिमेत जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे
पथक, तसेच ५७ पोलीस अधिकारी, २०७ पोलीस अंमलदार आणि १०१ होमगार्ड सहभागी झाले होते.
संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करून एकूण १,१३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान
वाहतूक नियम मोडणाऱ्या २२६ जणांवर केसेस करण्यात आल्या, तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या(
ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह) १२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.सराईত गुन्हेगार व वॉरंट
तज्ज्ञांची तपासणी: पोलिसांनी १५९ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच, हद्दपार 
केलेल्या ५० आरोपींची पडताळणी करण्यात आली असून, कोर्टाचे ८२ नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात
आले.

 अवैध धंद्यांवर कारवाई करत २३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तसेच २५५ हॉटेल्स आणि 
लॉजिंगची कसून तपासणी करण्यात आली. पोलीस अभिलेखावरील २० फरार आरोपी आणि ३६ पाहिजे 
असलेल्या आरोपींना शोधून कारवाई करण्यात आली.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि 
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस 
स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेमुळे गुन्हेगारी
वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

## ब्रेकिंग:महिला सूत्रधाराच्या मास्टरप्लॅनने टाकला होता दरोडा; जामखेड व खर्डा परिसरातील तब्बल १० गुन्हे उघडकीस!५ सराईत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) धडक कारवाई

- Link: https://policewarrantnews.in/breaking-masterplan-by-female-mastermind-exposed-a-total-of-10-crimes-uncovered-across-jamkhed-and-kharda-areas-5-habitual-offenders-arrested-in-a-high-impact-operation-by-the-local-crime-branch-lcb/
- Published: 2026-10-08T08:26:39+00:00
- Author: Police Warrant

**जामखेड (प्रतिनिधी):8 ऑक्टोबर 2026**जामखेड तालुक्यातील जवळा येथे घरात घुसून कुटुंबाला
कोयता व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे
शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना जेरबंद केले असून,
त्यांच्याकडून जामखेड आणि खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी व जबरी चोरीचे
तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे
दागिने जप्त करण्यात आले आहेत.**नेमकी घटना काय घडली होती?**दिनांक २ ऑक्टोबर २०२६ 
रोजी मध्यरात्री २:०० वाजेच्या सुमारास जवळा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी
मनिषा श्रीमंत गोरे (वय ४५) यांच्या घरी अज्ञातांनी बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी
घरातील सदस्यांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची भीती घातली आणि घरातील
सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
पसरले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७५/२०२६, बीएनएस (भारतीय न्याय
संहिता) कलम ३१० (२) प्रमाणे दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक
गुन्हे शाखेकडून समांतर तपास व कारवाईघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस
अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना तात्काळ अटक
करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.**त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे
यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. यामध्ये:**पोलीस अधिकारी:
पोउपनि अनंत सालगुडेपोलीस अंमलदार: निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब
काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत
राठोड, सुनिता पवार आणि अरूण मोरे यांचा समावेश होता.दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी हे
पथक गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे तपास करत
असताना खात्रीशीर माहिती मिळाली की, हा दरोडा प्रदिप उर्फ गुडया बिडकुत्या काळे (रा.
पिंपळगाव आवळा) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे.**पथकाने पिंपळगाव आवळा परिसरात
तातडीने छापा टाकून पुढील ५ आरोपींना ताब्यात घेतले:**1. प्रदिप उर्फ गुडया बिडकुत्या
काळे (वय ३०, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)2. अनिल सुल्या पवार (वय ३४, रा. पिंपळगाव
आवळा, ता. जामखेड)3. सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
4. रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)5. समाधान
उर्फ कारभारी दिपक काळे (वय २१, रा. खर्डा वाकी, ता. जामखेड)**गुन्ह्याची कबुली व महिला
सूत्राचा खुलासा**ताब्यात घेतलेल्या प्रदिप काळे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने
धक्कादायक खुलासा केला. हा दरोडा सारिका चंदन काळे (रा. चोभेवाडी, ता. जामखेड) हिच्या
सांगण्यावरून व तिने आखलेल्या नियोजनानुसार केल्याचे निष्पन्न झाले.**या गुन्ह्यात 
खालील ४ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत:**1. सारिका चंदन काळे (
मुख्य नियोजक, रा. चोभेवाडी, ता. जामखेड)2. लवचिक्या उर्फ लहु जालींदर पवार (रा. घोडेगाव,
ता. जामखेड)3. सोन्या नंग्या काळे (रा. धनेगाव, ता. जामखेड)4. परबत उर्फ प्रभाकर उर्फ
दिपक तुकाराम शिंदे (रा. अचानक तांडा, शिवडी, ता. मंठा, जि. जालना; हल्ली रा. कोरफळे,
ता. बार्शी, जि. सोलापूर)चोरी केलेले सोन्याचे दागिने सारिका काळे व तिचा पती परबत 
शिंदे यांच्याकडे विक्रीसाठी दिले होते.**जामखेड व खर्डा पोलीस ठाण्यातील १० गुन्हे
उघडकीस**आरोपी समाधान उर्फ कारभारी काळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, या टोळीने
जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि 
चौंडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी घरफोडी व चोऱ्या केल्याचे समोर आले.**तपासादरम्यान
उघडकीस आलेले गुन्हे:**जामखेड पोलीस ठाणे: गु.र.नं. २७९/२०२६, २८५/२०२६, ३२४/२०२६, 
३२३/२०२६, ५१७/२०२६, ३९५/२०२६, ६४३/२०२६, २७९/२०२६खर्डा पोलीस ठाणे: गु.र.नं. १६१/२०२६६,९२,५००
रुपयांचा मुद्देमाल जप्तआरोपींनी चोरीचे सोन्याचे दागिने त्यांचे ओळखीचे भाऊ बिभीषण
सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर (दोघे रा. खर्डा हद्द वाकी, ता. जामखेड) यांच्याकडे 
ठेवण्यासाठी दिले होते.**जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपशील**:सोन्याची अंगठी(
०.५ ग्रॅम) – ₹ ७,०००/-सोन्याचे मंगळसूत्र (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-सोन्याची बोरमाळ (
१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-सोन्याची बोरमाळ – ३० मणी (१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-सोन्याचे
मणीमंगळसूत्र (७ ग्रॅम) – ₹ १०,५००/-सोन्याचे गंठण (१० ग्रॅम) – ₹ १,५०,०००/-सोन्याचे
गंठण (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-सोन्याची कर्णफुले (५ ग्रॅम) – ₹ ७५,०००/-एकूण जप्त सोन्याचे
वजन: ५२.५ ग्रॅमएकूण मुद्देमाल किंमत: ₹ ६,९२,५००/-ताब्यातील आरोपी रूक्या उर्फ लोकेश
बिडकुत्या काळे यास जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात हजर केले असून, तो २०१५ मधील
जबरी चोरीच्या एका गुन्ह्यातही (भादंवि ३९४) पाहिजे असलेला आरोपी आहे. इतर आरोपींना
मुद्देमालासह मुख्य दरोड्याच्या गुन्ह्यात जामखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले 
आहे.ही कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव
कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.**कोट**जामखेड
तालुक्यातील जवळा येथील दरोड्याच्या घटनेनंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
यांनी पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच, पोलीस अधीक्षकांशी
संपर्क साधून दरोडेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे कठोर निर्देश दिले होते, ज्यानंतर
पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.

## जामखेड तालुक्यात गुटखा माफियांवर पोलिसांची धडक कारवाई; भवरवाडी अन् पोकळेवस्तीत एलसीबीची धाड

- Link: https://policewarrantnews.in/police-crackdown-on-gutkha-mafias-in-jamkhed-taluka-lcb-raids-bhabharwadi-and-pokalewasti/
- Published: 2026-10-07T08:42:10+00:00
- Author: Police Warrant

**जामखेड (विशेष प्रतिनिधी):७ ऑक्टोबर २०२६
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)
अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरुद्ध जिल्ह्यात दिनांक ६ ऑक्टोबर व ७ ऑक्टोबर
रोज़ी धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जामखेड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या
छाप्यात एकूण १,४१,५१६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.जामखेड परिसरातील कारवाईचा सविस्तर
तपशील:१) भवरवाडी (जामखेड) कारवाई:दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८३/२०२६ (
BNS १२३, २२३, २७४, २७५)जप्त मुद्देमाल: ₹२८,३४०/- किमतीचा गुटखा व तंबाखू साठाकारवाईतील
आरोपी: अर्जुन गहिनीनाथ सोनटक्के (रा. भवरवाडी, ता. जामखेड)२) पोकळेवस्ती (जामखेड) 
कारवाई:दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८४/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५, ३(
५))जप्त मुद्देमाल: ₹१,१३,१७६/- किमतीचा अवैध मुद्देमालकारवाईतील आरोपी: श्वेत शिवाजी
वीर (रा. पोकळेवस्ती, जामखेड)फरार आरोपी: आशुतोष शामराव रहाणे (रा. शिर्डी) व किरण 
बोराडे (रा. पाथरूड, ता. भूम, जि. धाराशिव)जामखेड तालुका व शहरात अशाप्रकारे अवैध गुटखा
व तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांची कडक नजर राहणार
असून कठोर कारवाई केली जाईल.

## BREAKING: भीषण पाणीटंचाईचे भीषण वास्तव: पाणी उपसताना पाय घसरला आणि…; आनंदवाडी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

- Link: https://policewarrantnews.in/breaking-the-grim-reality-of-severe-water-scarcity-foot-slipped-while-drawing-water-rama-geete-dies-after-falling-into-well-in-anandwadi/
- Published: 2026-10-06T10:13:28+00:00
- Author: Police Warrant

जामखेड (प्रतिनिधी):६ ऑक्टोबर २०२६

जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे भीषण पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले असून, विहिरीचे
पाणी खोल गेल्यामुळे सकाळी पाणी उपसण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत
पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बबन बन्सी गीते (वय – ४८आनंदवाडी,
ता. जामखेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जामखेड तालुक्यात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे विहिरींनी
तळ गाठला आहे. आनंदवाडी परिसरातील विहिरींमधील पाणी खोल गेल्याने दैनंदिन वापरासाठी
पाणी मिळवणे कठीण झाले आहे. गुरुवारी सकाळी बबन गीते हे विहिरीवर पाणी काढून आणण्यासाठी
गेले होते. विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी उपसत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि 
ते थेट खोल विहिरीत कोसळले.

या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच
स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच
त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे आनंदवाडीसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ
व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात चिंतेचे वातावरण:

जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या दुष्काळामुळे पाण्याची बिकट समस्या
निर्माण झाली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा
लागत आहे. या घटनेनंतर हा “जामखेड तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी” असल्याची चर्चा
संपूर्ण तालुक्यात पसरली असून, प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची आणि टँकरची 
सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

## भेसळखोरांचे धाबे दणाणले!खर्ड्यात बनावट दूध पावडरचा मोठा साठा जप्त; एफडीएची ५.२७ लाखांची कारवाई, साठा जागीच नष्ट

- Link: https://policewarrantnews.in/adulterators-terrified-massive-stock-of-fake-milk-powder-seized-in-kharda-fda-takes-action-worth-5-27-lakh-stock-destroyed-on-site/
- Published: 2026-10-06T07:14:45+00:00
- Author: Police Warrant

खर्डा / ६ ऑक्टोबर २०२६

दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA)
खर्डा परिसरात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

खर्डा जवळील नागोबाची वाडी येथे एका शेतात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली तब्बल २,४००
किलो बनावट दूध पावडर प्रशासनाने जप्त करून जागीच नष्ट केली. या जप्त करण्यात आलेल्या
साठ्याची एकूण किंमत ५ लाख २७ हजार ५६० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह अहिल्यानगर आणि
नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०
वाजेच्या सुमारास नागोबाची वाडी येथील अमृतलिंग मंदिराजवळील एका शेतात छापा टाकला.

या कारवाई दरम्यान पथकाला प्लास्टिकच्या २० किलो क्षमतेच्या तब्बल १२० विनालेबल पिशव्या
आढळून आल्या. या सर्व पिशव्यांमध्ये बनावट दूध पावडर भरलेली होती.

या साठ्याबाबत रामदास भानुदास गोपाळघरे (वय २८, रा. नागोबाची वाडी) याची कसून चौकशी
करण्यात आली असता अनेक धक्कादायक व गंभीर बाबी समोर आल्या. साठवणूक करण्यात आलेली ही
दूध पावडर थेट जमिनीवर अस्वच्छ वातावरणात ठेवली होती, तसेच वरून छताचे पाणीही त्यावर
गळत होते. या व्यतिरिक्त गोपाळघरे याच्याकडे अन्न साठवणुकीचा किंवा विक्रीचा कोणताही
वैध परवाना (License) नव्हता. खरेदी-विक्रीचा कोणताही अधिकृत अभिलेख किंवा बिल तो अधिकाऱ्यांसमोर
सादर करू शकला नाही.

नेटवर्क नसताना ऑफलाइन पंचनामा; जेसीबीने साठा केला नष्ट:

छापा टाकलेल्या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या 
अधिकाऱ्यांनी तत्काळ ऑफलाइन पद्धतीने सर्व कायदेशीर पंचनामा पूर्ण केला. प्रयोगशाळेत
विश्लेषणासाठी या पावडरचा २ किलोचा नमुना घेण्यात आला आहे.

तपासणीचा अहवाल येईपर्यंत हा साठा सुरक्षित ठेवण्यास संबंधित मालकाने असमर्थता दर्शवली.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेता अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने
खड्डा खोदून सर्व २,४०० किलो बनावट दूध पावडर जागीच गाडून नष्ट केली.

याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी
रामदास भानुदास गोपाळघरे याच्याविरुद्ध खर्डा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके
कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या
या धाडसी कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

## उबेर गाडी बुक करून कोयत्याच्या धाकाने कार पळविणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून बदलापूर येथून ३ आरोपींना अटक

- Link: https://policewarrantnews.in/gang-that-booked-an-uber-and-stole-a-car-at-sickle-point-busted-3-accused-arrested-from-badlapur-by-local-crime-branch/
- Published: 2026-10-05T08:15:33+00:00
- Author: Police Warrant

अहिल्यानगर:५ ऑक्टोबर २०२६
नाशिक येथून शिर्डीकडे जाण्यासाठी उबेर (Uber) गाडी बुक 
करून, चालकाला कोयत्याचा धाक दाखवत तिघांनी कार व मोबाईल जबरीने पळवून नेल्याची धक्कादायक
घटना घडली होती. याप्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत 
बदलापूर (जि. ठाणे) येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून कारसह ११
लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.काय आहे नेमकी घटना?दिनांक
१ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास सोपान गोविंद दंडगुले (वय ३६, रा.
दिघी, पुणे) हे आपल्या अर्टिगा कारने उबेरवरून मिळालेले भाडे घेऊन नाशिक येथून शिर्डीकडे
चालले होते. दरम्यान, गाडीत बसलेल्या तीन प्रवाशांनी कोपरगाव परिसरामध्ये चालकाला गाडी
पोहेगावच्या दिशेने घेण्यास सांगितली. त्यानंतर आरोपींनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून
त्यांचे तोंड, डोळे, हात व पाय दोरीने बांधले. चालकाला वांबोरी (ता. राहुरी) येथे गाडीतून
खाली ढकलून देत आरोपी अर्टिगा कार व मोबाईल घेऊन पसार झाले. याप्रकरणी राहुरी पोलीस
ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११३३/२०२६ BNS कलम ३०९(६), १४०(३), ३(५)) दाखल करण्यात आला
होता.लअहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप दरवडे व
विशेष पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान हे कृत्य बदलापूर येथे वास्तव्यास असलेल्या तीन तरुणांनी केल्याची पक्की
माहिती मिळताच पथकाने बदलापूर गाठून तिघांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेले आरोपी:
१. शामसुंदर रविप्रताप गौड (वय २६, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. महाराजगंज, उत्तर
प्रदेश)२. सिध्दार्थ मिथवा चव्हाण (वय १९, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. आष्टी, जि.
बीड)३. किसन दिग्वीजय कहार (वय २२, रा. बदलापूर, जि. ठाणे, मूळ रा. महाराजगंज, उत्तर
प्रदेश)११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्तआरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेली
अर्टिगा कार जेऊर टोलनाक्याजवळील हनुमान मंदिर परिसरात लॉक करून ठेवल्याची आणि ती विकण्यासाठी
गिऱ्हाईक शोधत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून:१०,००,००० रुपये किंमतीची
मारुती सुझुकी अर्टिगा कार१,७१,००० रुपये किंमतीचे ३ मोबाईल, सीमकार्ड व कारची चावी२००
रुपये किंमतीच्या २ लोखंडी कत्ती (कोयते)असा एकूण ११,७१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला आहे.आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन 
करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली
पोनि संतोष मुटकुळे, पोउपनि संदीप दरवडे, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे,
भगवान सानप, सतीश भवर, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथकाने केली.

## पगारवाढ होताच कंत्राट बदलले! मोहरी सोलर प्लॅनेटवरील ३३ सुरक्षारक्षकांना शिवीगाळ व धमकी; गुंड प्रवृत्तीच्या नवीन एजन्सीविरोधात रोषअण्णा एंटरप्रायझेस’च्या मुजोरीविरोधात कामगार आक्रमक;सभापती प्रा. राम शिंदेंकडे न्याय मागितला!

- Link: https://policewarrantnews.in/contract-changed-right-after-salary-hike-33-security-guards-at-mohari-solar-planet-abused-and-threatened-outrage-against-goon-minded-new-agency-workers-aggressive-against-the-arrogance-of-anna-enterpr/
- Published: 2026-10-04T07:06:46+00:00
- Author: Police Warrant

जामखेड:४ ऑक्टोबर २०२६
तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी येथील सोलर प्लॅनेटवर प्रकल्प
सुरू झाल्यापासून सलग ३ वर्षे अविरत आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या ३३ सुरक्षारक्षकांवर
नव्याने आलेल्या एजन्सीकडून तीव्र अन्याय होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
पगारवाढ मिळताच कंत्राट बदलून सुरक्षारक्षकांना धमकावल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची
लाट पसरली आहे.मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘वैष्णवी सिक्युरिटी सर्व्हिस’च्या
मालकांनी सातत्याने पाठपुरावा करून चालू महिन्यातच सुरक्षारक्षकांसाठी पगारवाढ मंजूर
करून आणली होती. मात्र, पगारवाढ मंजुरीनंतर कंपनीने अचानक सदर एजन्सीला काढून ‘अण्णा
एंटरप्रायझेस सिक्युरिटी’ या नव्या एजन्सीला कंत्राट दिले.नवीन कंत्राटदार ‘अण्णा एंटरप्रायझेस’च्या
प्रमुखाकडे सुरक्षारक्षकांनी हक्काच्या पगारवाढीची मागणी केली असता, त्यांना अर्वाच्य
भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तसेच धमक्या देऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर
आरोप कामगारांनी केला आहे.ही नवीन एजन्सी वेळेवर पीएफ (PF) आणि ईएसआयसी (ESIC) ची रक्कम
जमा करत नाही, तसेच कर्मचाऱ्यांचे तब्बल ६-६ महिने पगार तुंबवून ठेवते, अशी माहिती 
समोर आली आहे.सर्व ३३ सुरक्षारक्षकांच्या पाठीशी ‘अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेना’ खंबीरपणे
उभी राहिली असून कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. मात्र, एजन्सीचे प्रमुख गुंडगिरीच्या
बळावर ही युनियन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.सुरक्षारक्षकांची ठाम भूमिका:“आम्हाला
गुंड प्रवृत्तीची ‘अण्णा एंटरप्रायझेस’ ही एजन्सी नको असून, वाढीव पगारासह पूर्वीचीच‘
वैष्णवी सिक्युरिटी सर्व्हिस’ पूर्ववत ठेवावी,” अशी ठाम भूमिका सर्व ३३ सुरक्षारक्षकांनी
घेतली आहे.गेल्या ३ वर्षांपासून प्रामाणिक सेवा करणाऱ्या या कामगारांवरील अन्याय त्वरित
थांबवावा, गुंडगिरी करणाऱ्या नवीन एजन्सीवर कडक कारवाई करावी आणि वैष्णवी सिक्युरिटी
सर्व्हिसला पूर्ववत काम द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी पोलीस वारंट न्यूज नेटवर्कवर
बोलताना केली आहे .सदर प्रकरणाची न्यायाची मागणी फोन वरून संपर्क साधून सुरक्षकानी 
विधानपरिषेद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे. व त्यांनी सभापती राम शिंदे
यांच्याकडूनच आम्हाला गोरगरिबांना न्याय मिळणार असल्याचे सांगितलेविधानपरिषद सभापतींकडे
न्यायाची साद:या संपूर्ण अन्यायाविरोधात सुरक्षारक्षकांनी फोनवरून संपर्क साधून विधानपरिषद
सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. “आमच्यासारख्या 
गोरगरिबांना सभापती राम शिंदे यांच्याकडूनच न्याय मिळेल,” असा विश्वास सुरक्षारक्षकांनी
व्यक्त केला आहे.
